मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. मोदींनी आज (१९ नोव्हेंबर) तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं देशभरातून कौतुक होत आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांनी अनेकांनी आपले प्राण गमावलं. या शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या ७०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची मोदींनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचं खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत केली आहे.
राऊत ट्वीटमध्ये म्हणालं, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ७०० शेतकऱ्यांनी आंदोलनात जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी माफी मागावी. ज्या आपले जीव गमावले त्यांना कुटुंबांसाठी सरकारनं आर्थिक मदत जाहीर करावी. दरम्यान, लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणातील सर्व शेतकऱ्यांवरील खटलं मागं घ्यावेत. जय जवान, जय किसान,” असे ट्वीट करत मोदीवर टीका केली.
PM Modi should apologise to the family members of 700 farmers who lost lives, he should also announce monetary relief for those who lost lives and he should also withdraw all cases against Farmers including cases registered for violence on Red Fort.
जय जवान
जय किसान— Sanjay Raut (@rautsanjay61) November 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.