HW News Marathi
महाराष्ट्र

“कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात हात असेल तर तो आमचा हात!”

मुंबई | “कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात हात असेल तर आमचा हात आहे. आम्ही तो काही अमान्य करत नाही,” असे म्हणात भाजपचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचं खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या युनियन लिडरवर विश्वास नाही. त्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं आहे, अशी खंतही पाटलांनी यावेळी सांगितली. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीला संबोधित पाटील म्हणालं. तसेच आता सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना बरखास्त झाल्यात आणि आंदोलनाचं नेतृत्व भाजपकडे आलं, असं वक्तव्यही पाटलांनी यावेळी केले.

दरम्यान, एसटी महामंडळाला राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संपा करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेनेचं खासदार संजय राऊत वेळोवेळी करत आहे. तर “कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात हात असेल तर आमचा हात आहे. आम्ही तो काही अमान्य करत नाही,” असे म्हणत राऊतांवर टीका केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय करावा लागणार

“एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे. आपल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काय करायचं. यासंदर्भात आपल्याला या बैठकीत निर्णय करावा लागणार असल्याचं मतही पाटलांनी यावेळी मांडलं. तसेच सदाभाऊ खोत आणि गोपींचद पडळकर गेल्या आठवडाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात उपोषणाला बसलं आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांसाठी आता ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात!

News Desk

मुंबईच्या NCB अधिक्षकाला विनयभंगाप्रकरणी अटक!

News Desk

विद्यार्थ्यांसाठी उद्योगक्षेत्राने कमवा व शिका योजना राबवा

News Desk