मराठा आणि ओबीसी आरक्षणप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य समाजाची दिशाभूल करणारं आहे. खर्याचा सामना करता येत नाही, म्हणून जनतेला खोटं सांगण्यासाठी खासदार शरद पवार दौरा करणार असतील, तर त्यांच्या ज्या ठिकाणी सभा होतील, त्या ठिकाणी भाजपच्यावतीनं दुसर्या दिवशी सभा घेवून पोलखोल केली जाईल, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. 58 वर्ष केंद्रात सत्ता असताना आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथील का केली नाही, तेव्हा ते झोपा काढत होते का? असा संतप्त सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर या वयात खासदार शरद पवार यांनी गावभर दौरे करण्याची गरज नाही. पाच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येवून प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडल्यास, वस्तुस्थिती समोर येईल, असंही चंद्रकांतदादा म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर आज पत्रकार परिषद घेवून भूमिका मांडली.
#SharadPawar #ChandrakantPatil #BJP #NCP #MarathaReservation #OBCReservation #Maharashtra
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.