HW News Marathi
देश / विदेश

“बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी” – नरेंद्र मोदी

मुंबई | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पुण्यात निधन झाले. बाबासाहेब यांनी आज (१५ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजून ७ मिनिटनं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब यांच्यावर दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली. मोदींनी ट्वीटमध्ये बाबासाहेबांच्या भेदीचा फोटो ट्विट केले आहे.

मोदी ट्वीटमध्ये म्हटलं, “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पुढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील,” असं म्हटलं आहे.

राज्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. “शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याविरोधात पुकारले बंड

News Desk

वारसा, संस्कार व ज्ञानातून देशाला सर्वोत्तम सेवा देणार! – सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत

Aprna

बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर, ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय बायडेन मागे घेण्याची शक्यता

News Desk