अमरावती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्याच्या राजकारणात नेहमी कोणत्या ना कोणत्या चर्चेवरून चर्चेत येत असतात. आणि आता देखील तसंच काहीस झाल आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा एकेरी उल्लेख हा पाटलांकडून झाला होता आणि सत्ताधाऱ्यांकडून यावर चांगलीच टीका देखील करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्या बद्दल असंच काहीसं झालंय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही, अस वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.दा
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही
भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे आता वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. आणि याबाबत पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला आणि त्यावर मात्र चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करण्याची संधी काही सोडलेली नाहीये. आपल्या टोकाच्या टिकेतून पाटील म्हणाले की, आम्ही खूप व्यापक मनाचे आहोत. त्यामुळेच सहकार मंत्री अमित शहा हे वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगात बेसिक संशोधन करणारी इन्स्टिट्यूट आहे. सत्तेत असताना मी ही बऱ्याच वेळा या संस्थेला भेट दिली आहे. आता अमित शहा हे सहकार मंत्री आहे. त्यामुळे ते वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकतात. त्यात काहीही चुकीचे नाही. वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूट काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही. असं वक्तव्य आता चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीमध्ये केले.
शहा पवारांना भेटले तर काहीही चुकीचे नाही
यावेळी मात्र एकीकडे चंद्रकांत पाटलांकडून टीका करण्यात आली तर दुसरीकडे शरद पवारांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली चांगली संस्था आहे. या दौऱ्यात शहा पवारांना भेटले तर काहीही चुकीचे नाही, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. 26 नोव्हेंबर रोजी अमित शहांचा दौरा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सहकार मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेस भेट देणार आहेत. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इस्न्टिट्यूटच्या भेटीचा या दौऱ्यात समावेश आहे. म्हणून आता भाजपकडून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर काय उत्तर येणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.