HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुरा पोलिसांकडून HW न्यूज नेटवर्कच्या पत्रकारांविरुद्ध FIR दाखल

नवी दिल्ली । HW न्यूज नेटवर्कच्या दोन पत्रकार समृद्धी सकुनिया आणि स्वर्णा झा यांच्याविरुद्ध त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील फातिक्रोय पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम १२० ब (गुन्हेगारी कट), कलम १५३ अ (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणं) आणि कलम ५०४ (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार समृद्धी आणि स्वर्णा या दोघींनी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्रिपुरा राज्यात उसळलेल्या हिंसाचाराचं वार्तांकन केलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या सदस्या कांचन दास यांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सदर एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, समृद्धी आणि स्वर्णा यांनी उनाकोटी जिल्ह्यातील पॉल बाजार भागात मुस्लिम वस्तीला भेट दिली तेव्हा त्यांनी “हिंदू आणि त्रिपुरा सरकारविरुद्ध भडकावणारी भाषणं/वक्तव्यं” केली. तक्रारकर्त्यांचं असं म्हणणं आहे की, “समृद्धी यांनी पॉल बाजार मशिदीला लागलेल्या आगीमागे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल असल्याचा खोटा उल्लेख केला आहे.”

तक्रारकर्त्यांने असा आरोप केला आहे की, “हा गुन्हेगारी कटाचा एक भाग असून त्रिपुरातील जातीय सलोखा नष्ट करण्यासाठी तसेच विहिंप आणि त्रिपुरा सरकारला बदनाम करण्यासाठी संबंधित पत्रकारांनी त्या घटनेत जाणूनबुजून विहिंपचं नाव टाकलं. ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायातील सलोख्यावर परिणाम होईल.”

समृद्धी सकूनिया यांच्या म्हणण्यानुसार, “पोलीस रात्री साडेदहा वाजता ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहत होते तेथे पोहोचले आणि पहाटे साडेपाच वाजता एफआयआरची प्रत दिली. मात्र, पोलिसांनी यावेळी कोणतंही वॉरंट सादर केलेलं नाही.”

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चं कलम ४६ असं सांगतं की महिलांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक केली जाऊ शकत नाही. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम ४६ मधील उपकलम (४) मधील तरतुदींनुसार, जर पोलिसांना एखाद्या महिलेला सूर्यास्तानंतर अटक करायची असेल, तर त्यांनी दंडाधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेऊन एका महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फत ही अटक करावी.

अपरिहार्य परिस्थितीतही ज्यांच्या स्थानिक अधिकारक्षेत्रात संबंधित गुन्हा घडला आहे अशा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र, यावेळी त्रिपुरा पोलिसांकडे न्यायालयाचा असा कोणताही आदेश नव्हता. समृद्धी सकुनिया यांनी सांगितलं. यावेळी हॉटेलबाहेर जवळपास १६ ते १७ पोलिस तैनात होते.

दरम्यान, HW न्यूज नेटवर्क लवकरच अधिकृत निवेदन जारी करेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०% सवर्ण आरक्षण जम्मू-काश्मीरमध्येही लागू, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

मोदींना नटसम्राट बनायचं असेल तर सिनेमात जावं ! नाना पटोलेंची घणाघाती टीका 

News Desk

चुकून तुम्ही राज्यात पुन्हा सत्तेवर आलात तर जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही !

News Desk