HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याच्या आरोपाला आता शरद पवारांकडून राज ठाकरेंना उत्तर!

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याला आता स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असं शरद पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

ओबीसींची शुद्ध फसवणूक

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणावरुन फसवणूक केल्याचा दावा केला. घटना दुरुस्तीने आरक्षण मिळेल हा गैरसमज असून, केंद्राकडून ओबीसींची शुद्ध फसवणूक होत आहे, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.

यावेळी शरद पवारांना राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी पवारांनी जोरदार टोला लगावला. राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार यांचे लिखाण वाचावे, असं शरद पवार म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

नवाब मलिक यांचे उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरमधील महापालिका कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

News Desk

राज्यातील पुरग्रस्तांना अर्थसहाय्य म्हणून ५ हजार रुपये रोख

News Desk

फडणवीसांचे राजकारण इतके खुनशी असेल असे वाटले नव्हते – अमोल मिटकरी

News Desk