HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूरमधील महापालिका कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

नागपूर | बस कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला. सकाळी बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. नागपूर महापालिकेच्या बस सेवेचे चालक आणि वाहक कालपासून संपावर आहेत. राज्य सरकारने मेस्मा लावल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. तुर्तास संप मागे घेतला असला तरी मेस्मा विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा भारतीय कामगार सेनेने दिला आहे.

वेतन वाढीसाठी अडीच ते तीन हजार बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. शहरात दररोज ३५० च्यावर बसेस धावतात. हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर, कन्हान, वाडी, चौदा मैल, खापरखेडा, पारडी, नरसाळा, पिपळा असा शहरापासून जवळपास ३० किलोमीटरचा प्रवास करतात. ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने बसने प्रवास करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील पण… प्रविण दरेकर यांची अजान पठणवरून टीका

News Desk

राज ठाकरे अद्यापही औरंगाबादमध्येच, कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेणार

swarit

“मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली, पत्र लिहिलं पण…”,राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

News Desk