HW News Marathi
महाराष्ट्र

“दर महिन्याला त्यांच्या पदरामध्ये वेळेत ते वेतन पडलं पाहिजे”, शरद पवारांचा “तो” व्हिडिओ व्हायरल

मुंबई। राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चांगलंच चिघळलेलं पाहायला मिळतय, आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि अडचणींबाबत राजकीय पक्ष गप्प का आहेत? असा सवाल आता विचारला जातोय. कारण, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या भाषणाची एक क्लीपही समोर आलीय. यात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचना करताना दिसून येतात. ते ही एसटी कर्मचाऱ्यांच्याच एका कार्यक्रमात! म्हणून आता राजकीय वर्तुळात सुधीर मुनगंटीवार यांचा व्हिडीओ आणि शरद पवार यांची क्लिप व्हायरल झाल्याने आता चर्चांना उधाण आल आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एसटी कामगार संघटनांचं 56 व्या अधिवेशन 14 फेब्रुवारी 2020 रोजी पार पडलं होतं. या अधिवेशात बोलताना शरद पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला पाहिजे असं मत मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचना केली होती. त्यावेळी पवार म्हणाले होते की, ‘या सगळ्या कामामध्ये कर्मचाऱ्यांनी मनापासून सहकार्य केलं. केंद्राप्रमाणं वेतन, केंद्राप्रमाण भत्ता, केंद्राप्रमाणं पेंशन. या गोष्टी आज महाराष्ट्रातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतात आणि नेमकी तिच स्थिती आज एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी करण्याच्याबद्दलचा निर्णय हा जर घेता आला. मग त्यांना शासकीय कर्मचारी म्हणा किंवा आणखीन काही म्हणा. दर महिन्याला त्याच्या पदरामध्ये वेळेत ते वेतन पडलं पाहिजे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते.

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना शरद पवार यांनी 25 फेब्रुवारी 2019 रोजी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन सरकारवर चांगलीच तोफ डागली होती. त्यावेळी पवार म्हणाले होते की, 7 वा वेतन आयोग देण्याची घोषणा केली होती का ? आयोग सातवा कोणाला देतात ? सरकारी कर्मचाऱ्याला. याचा अर्थ एसटी कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे. हे अप्रत्यक्षपणानं मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी सांगितलं. किती दिवस झाले अधिवेशन होऊन, कधी झालं होतं ? अशी घणाघाती टीका त्यावेळी शरद पवार यांनी केली होती. मग आता सर्वसामान्य प्रश्न पडतोय की तेच शरद पवार आता कुठे गेलेत.

दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचा व्हायरल व्हिडिओ?

खासदार संजय राऊत यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सडकून टीका केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुनगंटीवार यांचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्या व्हिडीओमध्ये मुनगंटीवार एसटीचं विलिनीकरण शक्य नसल्याचं सांगताना दिसून येत आहेत. म्हणून आता सर्वसामान्यांना एकच प्रश्न पडला आहे की सगळेच राजकीय पक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात दिसून येत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले असल्याने तीव्र नाराजीची भावना व्यक्त करण्यात येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्य आज ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करणार?

Aprna

जाणून घ्या…निरा डाव्या कालव्याचा संघर्ष

News Desk

आमच्या विश्वासार्हतेला तडा गेला !

News Desk