मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयावर पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज ठाकरे हे पवारांच्या सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज ठाकरेंसह एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळही असणार असल्याची माहिती मिळली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी काल (१२ नोव्हेंबर) राज ठाकरे यांच्या निवसस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या राज ठाकरेंकडे मांडल्या होत्या. यावेळी राज ठाकरे म्हणालं, “मी तुमचं नेतृत्व करायला, यावर सरकारशी चर्चा करेन. पण, तुम्ही आत्महत्या करू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी केले होते.
कर्मचाऱ्यांनी कामावर या- अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर या असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (१२ नोव्हेंबर) केले आहे. “एसटीच महामंडळाची राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी लगेच पूर्ण होण्यासारखी नाही. विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं हायकोर्टासमोर मांडावे. आम्ही चर्चा करायला तयार आहोत,” असे परब माध्यमांशी बोलताना म्हणालं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.