HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्षं साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च मध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ सुरू केला होता, जो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

– ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या युवा पिढीने देशाचं नाव उज्वल केलं आहे. हे सगळे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान. आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी अशी कामगिरी युवा पिढीने केली आहे.

– देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना वंदन करण्याचा दिवस. देशासाठी सर्वस्व पणाला लावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह झाशीची राणी, राणी चेन्नमा, राणी गंडिल्यू यांच्यासह पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करण्याचा दिवस. देश या महापुरुषांचा ऋणी राहील.

– आपली लोकसंख्या प्रचंड आहे. आपली जीवनशैली वेगळी आहे. अनेक देशवासीयांना आपण वाचवू शकलो नाही. अनेक बालकं अनाथ झाली. घरातली कर्ती माणसं निघून गेली. या वेदना सदैव आपल्याबरोबर असतील.

– आपल्या वैज्ञानिकांनी कोरोनावर लस शोधून काढली. लशीसाठी आपण कोणत्याही देशावर अवलंबून नाही. आपली स्वत:ची लस नसती तर आपलं काय झालं असतं याचा विचार करा. जगभरात कोरोनाचं संकट आहे. आपल्याकडे लस नसती तर आपल्याला लस मिळाली असती का? जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे.

– ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या युवा पिढीने देशाचं नाव उज्वल केलं आहे. हे सगळे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान. आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी अशी कामगिरी युवा पिढीने केली आहे.

– अमृतमहोत्सवाचं लक्ष्य आहे की अशा भारताचं निर्माण जिथे सुविधा सर्वसमावेशक असतील. अशा भारताचं निर्माण जिथे नागरिकांच्या जीवनात सरकार विनाकारण दखल घेणार नाही.

– ईशान्य भारत, लडाख, जम्मू-काश्मीर हे भारताच्या विकासाचं मोठे आधारस्तंभ होणार आहेत. ईशान्य भारतात दळणवळणाच्या सोयी प्रस्थापित केल्या जात आहेत. ईशान्य भारतात ऑर्गनिक फार्मिंग, हर्बल मेडिसिन, पर्यटन यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आपल्याला हे काम अमृतमहोत्सवाच्या काही दशकातच पूर्ण करायचं आहे.

– समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. भ्रष्टाचाराला जराही थारा नाही. अनेक योजना राबवल्या जात आहेत. गरिबांना पोषणयुक्त तांदूळ. छोट्या गावखेड्यांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न. दलित, उपेक्षित, आदिवासींसाठी आरक्षण सुनिश्चित केलं जाईल.

– देशभरात 75 वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जातील. देशात हवाई वाहतुकीचं जाळं अधिक विस्तारलं जात आहे.

– भारत सहकार भावनेला महत्त्व देतो. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे. सहकार हा एक संस्कार आहे. सहकार म्हणजे एकत्र चालण्याची भावना आहे.

– मुलींसाठी सैनिक स्कूलचे दरवाजे खुले झाले आहेत. देशातील सगळ्या सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येईल. मिझोरममध्ये हा प्रयोग केला होता पण आता हा देशभरात लागू होणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना पॉझिटिव्ह आमदार चक्क पीपीई किट घालून मतदानासाठी हजर 

News Desk

प्रसिद्ध गझलकार, शायर राहत इंदौरी यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली

News Desk

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

News Desk