HW News Marathi
Covid-19

कोरोना पॉझिटिव्ह आमदार चक्क पीपीई किट घालून मतदानासाठी हजर 

नवी दिल्ली | देश एकीकडे कोरोनासारख्या भीषण संकटाला सामोरे जात असताना दुसरीकडे राजकीय हालचाली देखील सुरु आहेत. देशातील ८ राज्यांमध्ये आज (१९ जून) राज्यसभेच्या १९ जागांसाठीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. विशेषतः मध्य प्रदेशमधील भाजप-काँग्रेसमधील लढत अधिक चुरशीची आहे. याच मध्य प्रदेशात एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशात मतदानासाठी मध्य प्रदेशचे काँग्रेसच्या एका कोरोना पॉझिटीव्ह आमदाराने पीपीई कीट घालून मतदान केंद्रावर हजेरी लावली. पीपीई किट घालेल्या त्या आमदाराने विधानसभेत प्रवेश करताच उपस्थितांमध्ये मात्र मोठी खळबळ निर्माण झल्याचे चित्र पाहायला मिळाले. मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यावेळी एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. मध्य प्रदेश काँग्रेसचे आमदार कुणाल चौधरी हे चक्क पीपीई कीट घालूनच विधानसभेत दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच कुणाल चौधरी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. सध्या ते एका रुग्णालयात कोरोनावर उपचार देखील घेत आहेत. मात्र, असे असतानाही मतदानासाठी ते चक्क पीपीई किट घालून उपस्थित राहिले. त्यांच्या या कृतीमुळे निश्चितच काही वेळासाठी संबंधित परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कुणाल चौधरी मतदान करून गेल्यानंतर संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लसीकरण, चाचणी वाढवा ; उपाययोजनांची दंडात्मक अंमलबजावणी करा: डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

Aprna

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk