HW News Marathi
महाराष्ट्र

“गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव?”, चित्रा वाघांचा सरकारला सवाल

मुंबई | मनसे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मानसिक आणि शारीरिक छळासह, पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप संजीवनी यांनी केला आहे. त्यानंतर खुद्द संजीवनी काळेंनी पाठवलेला एक व्हिडीओ भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. “त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?” असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे.

कारवाई न करता सेटलमेंटचे आदेश दिलेत का ?

चित्रा वाघ यांनी या प्रकरणात आता लक्ष घातलं आहे आणि त्यांनी सरकारला सवाल केला आहे. या बाबतीत आपलं मत त्यांनी ट्विटर वरून मांडलं आहे. “हे काय चाललयं राज्यात, आपण पोलिसांना गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीवर कारवाई न करता सेटलमेंट करा असे आदेश दिलेत का ? गुन्हा नोंद होऊनही नवी मुंबई पोलीस कार्यवाही का करत नाहीत? कुठल्या अधिकारात सेटलमेंट करण्यास सांगत आहेत? उत्तर द्या” अशी मागणी चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ शेअर करत केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलीस यांना ट्विटरवर टॅग करत चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

सेटलमेंट करण्याचा विषय झाला

संजीवनी काळे यांनी एक विडिओ ट्विट करत त्यांनी न्यायची मागणी केली आहे. “नमस्कार चित्राताई, मी संजीवनी गजानन काळे, मी 11 तारखेला माझे पती गजानन काळेंवर एफआयआर दाखल केली होती, तीन दिवस उलटून झाले आहेत, तरीसुद्धा त्यांना अरेस्ट झालेली नाही, मला न्याय मिळालेला नाही, मी पोलिसांकडे गेले होते काल, तर पोलिसांनी माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सेटलमेंट करण्याचा विषय झाला” असं संजीवनी काळे व्हिडीओमध्ये म्हणतात.

“मला म्हणाले, तुला जे हवं ते मी करतो. त्याला घेऊन येतो मी पोलीस स्टेशनमध्ये, अशा पद्धतीने सेटलमेंटची भाषा माझ्यासोबत करण्यात आली आहे, तर चित्राताई मला न्याय हवा आहे, मला भीक नको आहे, मला न्याय हवा आहे, तो पण माझ्या मुलासाठी” अशी मागणी संजीवनी काळे या व्हिडीओच्या अखेरीस करताना दिसत आहेत.

काय आहे प्रकरण?

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहे. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

Aprna

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द,निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही – अजित पवार

News Desk

‘आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका, पण मतदान काँग्रेसलाच करा’

News Desk