HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंचा चौथ्यांदा पुणे दौरा!

पुणे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याचा दौरा करणार आहेत. उद्यापासून राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शिवाय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत .

ठाणे दौरा झाल्यावर

महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिनाभरातील राज ठाकरे यांचा हा चौथा पुणे दौरा आहे. राज ठाकरे हे 6 ऑगस्टलाही पुणे दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा पुणे दौऱ्याचं नियोजन केलं आहे.ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे 27 जुलैला पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता.

पुन्हा पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली होती. त्यानंतर आता राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर गेले आहेत.

नाशिकनंतर पुण्याच्या मैदानात

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांच्या नागपूरातील घरानंतर मुंबईतील घरावरही ED चा छापा

News Desk

“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका”, नितेश राणेंनी डिवचले

News Desk

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया

News Desk