HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ, ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे!

मुंबई। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशमुखांच्या विरोधात असलेल्या आरोपांच्या प्रकरणात ईडीनं चौकशीचा वेग वाढवला असल्याचं दिसून येत आहे. देशमुखांच्या चौकशीत ईडीच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती आहे. खाजगी बँकांकडून अनिल देशमुख यांनी नियमांचं उल्लंघन करत कर्ज घेतल्याचं समजतंय.

नेमकं काय केलं होतं

त्यामुळे आता नियमांचं उल्लंघन करुन लोन पास करण्यासाठी देशमुखांनी नेमकं काय केलं होतं, याचा तपास ईडी आता करत आहे. लोन म्हणून मिळालेली रक्कम देशमुख यांनी अशा कंपन्यांना ट्रान्सफर केली, ज्या कंपन्यांवर अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांचा हक्क आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

लोन घेतलेल्या पैशांचं काय केलं

पुढे ईडीच्या सुत्रांनी सांगितलं, तसंच ईडीनं या कंपन्यांची चौकशी केल्यावर अशी माहिती समोर आली आहे की, यातल्या काही कंपन्या खऱ्या तर काही शेल आहेत. त्यामुळे ईडी आता लोन घेतलेल्या पैशांचं काय केलं याची चौकशी करत आहे.

पलांडे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली

दरम्यान पोलिसांच्या बदल्यांमध्ये खासकरुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात होता, अशी कबुली आधीच सध्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला दिली आहे. इतकंच काय तर 4 मार्चला ज्ञानेश्वरी (अनिल देशमुखांचा मुंबईतील सरकारी बंगला) येथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतल्या बार मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी तक्रारीमध्ये केला होता. दरम्यान ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न’ची बाटली देत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणाला, “यानेही डोकं शांत झालं नाही तर…”

News Desk

निवडणुका होऊ द्या, मग…! धनंजय मुंडे-पंकजा मुंडे पुन्हा आमने-सामने

News Desk

महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२२ ची ८.९५ टक्के दराने परतफेड

Aprna