HW News Marathi
महाराष्ट्र

‘…ही ‘हेराफेरी ४’ साठी परफेक्ट स्क्रिप्ट, त्यात नवाबला ‘बाबूभाई’चा रोल द्या’, नितेश राणेंचा टोला


मुंबई। मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज नवनवे चेहरे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुनिल पाटील हेच या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा दावा काल भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. त्यावर भाजपा नेते नितेश राणेंनी ट्विट करत नवाब मलिकांना टोला लगावला आहे.सुनिल पाटील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, या सर्व घडामोडी म्हणजे ‘हेरा फेरी चार’ साठी ही परफेक्ट स्क्रिप्ट आहे. त्यात नवाबला ‘बाबूभाई’ चा रोल द्या, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले

भाजपा नेते मोहित कंबोल म्हणाले, एका पक्षाने या प्रकरणात देशभरात चुकीचा नॅरेटिव्ह सेट केला. त्या गाजलेल्या फोटोत आर्यन खानसह किरण गोसावी दिसत आहे. त्यानंतर गोसावी भाजपशी संबंधित असल्याचेही सांगण्यात आले, तो कसा आर्यन खानला ओढत एनसीबीच्या कार्यालयात घेवून आला, हे दाखवण्यात आले. पण या सगळ्या प्रकरणामागचा मास्टरमाईंड सुनील पाटील आहे. हा दावा करताना मोहीत कंबोज यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूजा यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

सॅम डिसूझा यांचा उल्लेख आजवर सर्वांनी केला

सुनील पाटील नामक व्यक्तीनेच क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची लीड एनसीबीला दिली होती. सॅम डिसूझा यांचा उल्लेख आजवर सर्वांनी केला. नवाब मलिक, संजय राऊत, प्रभाकर साईल या सगळ्यांनी त्यांचे नाव घेतले. पण सुनील पाटील यांनीच सॅम डिसूजाला १ तारखेला व्हॉट्सअॅप मेसेज आणि व्हॉट्सअॅप कॉल केला होता. त्यांनी सांगितले माझ्याकडे २७ लोकांची लीड आहे. क्रूजवर ड्रग्ज पार्टी होणार आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करून दे. यानंतर सॅम डिसुजाने एनसीबी अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्याशी बोलणे केले, आणि त्याबाबत सुनिल पाटीलला माहिती दिली, असेही मोहित कंबोल म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढीव वीजबिलाबाबत राज्य सरकारने अभ्यास करावा, रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

News Desk

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल!

News Desk

संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्याअर्थाने तारणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प !

News Desk