HW News Marathi
महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरे इलेव्हन’ दिवाळीपर्यंत तुरुंगात, किरीट सोमय्यांचा इशारा!

मुंबई। ठाकरे सरकारच्या बेनामी कारभारात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव आहे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे १९ बेनामी बंगले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार बेनामी सरकार आहे. त्यांचं इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार असल्याचा असा इशारा भाजप नेते किरिट सोमय्या यांनी दिला. परिवहन मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली, असा सवाल सोमय्यांनी केला

परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आरटीओ अधिकारी खरमाटे यांच्या सांगलीमधील मालमत्तांची सोमय्या यांनी सोमवारी (दि.६) पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. बजरंग खरमाटे यांचा पगार ७० हजार असताना त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली, असा सवाल सोमय्यांनी केला. सोन्या-चांदीची दुकानं, प्रथमेश पाईप फॅक्टरी खरमाटेंची आहे. प्रथमेश त्यांच्या मुलाचं नाव असून, त्याच्या नावाने अनेक उद्योग आहेत. अनिल परब यांच्या सचिवाची एवढी संपत्ती असेल तर खुद्द परबांची किती, असा सवालही सोमय्यांनी केला.

प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता असल्याचं सांगितलं जात

आम्ही ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा. अनिल परब प्रकरण आता सुरु आहे, खरमाटेंची ईडीकडून चौकशी

बजरंग खरमाटे यांची आज ईडीने चौकशी केली. खरमाटे दुपारी १२ वाजता चौकशीसाठी हजर झाले. त्यावेळी खरमाटेंकडे अनेक मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. खरमाटे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता असल्याचं सांगितलं जात असल्यानं, त्यादृष्टीने ईडीने चौकशी केली. ही संपत्ती कशी आली, मालमत्ता किती रुपयांना घेतली, पैसे कुठून आले, याबाबत चौकशी करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या उपस्थितीत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या समस्येबाबत बैठक

News Desk

आरोग्य विभागाच्या भरती, खुल्या किंवा ‘ईडब्ल्यूएस’तून एसईबीसीची पदे भरली जाणार

News Desk

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna