HW News Marathi
महाराष्ट्र

‘हॉटेल, रेस्टोरंट, मॉलबाबत विचार करुन निर्णय घेऊ’- अस्लम शेख

मुंबई | मुंबईत कोरोना रुग्ण संख्या कमी झळयाने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता रेस्टोरंट, हॉटेलची वेळ वाढवण्यावर चर्चा झाली. सध्या ४ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. रात्री १० वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याबाबत चर्चा झाली. येत्या १ ते २ दिवसात यावर निर्णय होईल. आजच्या कॅबिनेट बैठकीतही यावर चर्चा होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. मॉलबाबत सुद्धा प्रश्न आहेत. इनडोअर गेम सुरू करण्यासाठी सुद्धा मागणी होत आहे. सर्वांचा बारकाईने विचार केला जाईल, असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

सरकारला बरीच कामे पहावे लागतात

मुंबईत सगळं एकत्र चालू करून पुन्हा कोरोनाचा धोका वाढू नये याची काळजी सरकार घेत आहे. सरकारला बरीच कामे पहावे लागतात. मुंबईची परस्थिती आधीसारखी होऊ नयेत. टप्याटप्याने सर्व सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विरोधक कितीही दबाव टाकत असले, तरी आम्ही सर्वांचा विचार करत आहोत. गणेशोत्सव येत आहे, त्याबाबतसुद्धा नियमावली तयार होत आहे. मुखमंत्री स्वतः या सर्व बाबींवर काम करत आहेत, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.

विरोधकांच्या मनासारखे होणार नाही. मार्केटसुद्धा आम्ही खोलण्याच्या तयारीत आहोत. शाळा उघडण्यासाठी अनेकांची विविध मते आहेत. उद्या जर आपण सर्व खुले केले आणि पुन्हा केसेस वाढल्या तर मग काय? म्हणून आम्ही सर्व अभ्यास करून मगच खुले करू, असंही अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे.

दबाव टाकण्यापेक्षा लस मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवे

मुंबई लोकलने प्रवास करायचा असेल तर लसीचे २ डोस घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी आता लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. ऑफलाईन लस सुविधा सुद्धा सुरू करत होतो. जादूच्या छडीसारखे लगेच लस उपलब्ध होणार नाही. आम्ही लसीबाबत केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत. विरोधी पक्षांना विचारायला हवं. तुम्ही दबाव टाकण्यापेक्षा लस मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असं आवाहन अस्लम शेख यांनी केलं. जेवढं फास्ट लसीकरण होईल तेवढ्या लवकर आम्ही मुंबईत सुरू करू, असं त्यांनी सांगितलं आहे. लस न मिळाल्याने लोकांचे हाल होत आहे. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आमची तयारी आम्ही दाखवली. केंद्र सरकार लस वितरणाबाबत दुजाभाव करत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणी अण्णा हजारेंची महत्वाची प्रतिक्रिया…

News Desk

यशवंतराव  चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत

News Desk

राज ठाकरे यांनी संजय तुर्डेंची भेट घेतली

News Desk