मुंबई। एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांवर ड्रग्ज कारवाई आणि वानखेडेंवर करण्यात येणाऱ्या आरोपांवरुन नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. ड्रग्ज प्रकरण हे नवाब मलिकांचे षडयंत्र आहे. तर ड्रग्ज प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड हा सुनिल पाटील असून त्याचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रविवारी मी याबाबत खरं खोटं जनतेसमोर आणणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करत मोहित कंबोज यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. ” एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीतील सदस्याने पत्रकार परिषद घेऊन लोकांचे लक्ष विचलीत आणि दिशाभूल करण्यात आली आहे. परंतु यामध्ये फारसे यश येणार नाही. रविवारी मी याबाबत खरं खोटं जनतेसमोर आणणार” अशा आशयाचे ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.
A member of Sameer Dawood Wankhede's private army just held a Press Conference to misguide and divert the attention from the truth albeit unsuccessfully.
I will reveal the truth tomorrow— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 6, 2021
त्यामुळे मलिक आता कोणता खुलासा करणार आणि कोणावर निशाणा साधणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक उद्या म्हणजेच रविवार ७ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ललित हॉटेल आणि भाजपचे कनेक्शन काय आहे? याबाबतचा खुलासा कऱणार आहेत. नवाब मलिकांनी ड्रग्ज प्रकऱणात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मलिक आता कोणता खुलासा करणार आणि कोणावर निशाणा साधणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मोहित कंबोज यांचा नवाब मलिकांवर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. मलिकांनी एका अधिकाऱ्याला आणि केंद्रीय यंत्रणेला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप कंबोज यांनी केला. ड्रग्ज प्रकरणाचा खरा सुत्रधार सुनिल पाटील आहे. सुनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असून त्याची राष्ट्रवादीतील सर्व नेते आणि मंत्र्यांशी ओळख आहे. द ललित हॉटेलमध्ये सुनिल पाटील याचा कायमस्वरुपी रुम बुक असायचा आणि याच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील याला भेटायला जायचे. नवाब मलिक आणि सुनिल पाटील भेटल्यावर काय व्हायचे याबाबत मलिकांनी खुलासा करावा अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.