HW News Marathi
महाराष्ट्र

“24 तासातले दोन तास मला उचक्या लागतात”, नाव न घेता धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

बीड। परळी येथे आयोजित स्वर्गीय माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की,आपल्या मातीतल्या माणसाला वर करण्याची इच्छा असावी लागते मागच्या पाच वर्षाच्या काळात जो परळी अंबाजोगाई रस्ता करता आला नाही, तो रस्ता आम्ही अवघ्या दीड वर्षात आम्ही पूर्ण केला, नाव न घेता माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना लगावला टोला.पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणले की, मी ध्येय वेडा आहे मी स्वप्न पाहिले आहे की, आपल्या परळी मध्ये उद्योग आले पाहिजेत. आपल्या परळीकडे असंख्य लोकांनी वाटा वळवल्या पाहिजेत अशी परळी करायची आहे.सध्या एवढ्या मोठ्या टीकेचा मी धनी आहे. भुयारी गटाराचे एवढे मोठे काम चालू आहे मला दिवसाच्या 24 तासामधले 2 तास तरी मला गुचक्या लागतात कारण एवढे माझे नाव घेतले जाते.

नाव न घेता मुंडे भगिनीवर निशाणा

पण दिवसात मला 4 तास जरी गूचक्या लागून त्रास जरी झाला तरी मी घाबरत नाही, कारण विकास कामे करतांना थोडा वेळ तर लागणारच पण परळीचा चेहरा पूर्ण बदलणार, तुम्ही जनतेने माझ्यावर प्रेम विश्वास ठेवला तसाच पुढे ठेवाल अशी अपेक्षा आहे. अस धनंजय मुंडे म्हणाले, तर काही जण मला दोन वर्ष्याच्या कामाचा हिशेब मागत आहेत त्यांना पण मी हिशेब देणार ,नाव न घेता मुंडे भगिनीवर यावेळी धनंजय मुंडे यांनी निशाणा साधलाय.हा कार्यक्रम परळी येथील काळाराम मंदिरात आयोजित करण्यात आला होता यावेळी परळी पंचक्रोशीतील तमाम मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

‘अजूनपर्यंत तरी शुभेच्छा आल्या नाहीत’

पवारांसाहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थनाही केली, असं धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी, ‘बहिणीकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा आल्या का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, ‘अजूनपर्यंत तरी शुभेच्छा आल्या नाहीत. तुमच्याकडे आल्या असतील तर मला सांगा’, असं म्हणत त्यांनी पत्रकारांची फिरकीही घेतली.शरद पवार हे शक्तीपीठ आहे. त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आम्ही तो कधीही यशस्वी होणार नाही त्यासाठी वाटेल ते करु, पण पवारसाहेबांवर होणारे वैयक्तिक हल्ले रोखू, असं धनंजय मुंडे म्हणाले. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात पण खालच्या पातळीला जाऊन ते आरोप प्रत्यारोप होऊ नयेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूध पुरवठा सुरळीत राहणार | मुख्यमंत्री

News Desk

पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करा – अजित पवार

News Desk

रमाई आंबेडकरांच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे राष्ट्रपतींच्याहस्ते अनावरण

News Desk