HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्र्यांचीही दिवाळी ‘गोड’ होऊ देणार नाही!; कृषीमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन 

मालेगाव । “शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली. आता मंत्र्यांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही”, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दादा भुसे यांच्या घराबाहेर आंदोलन छेडलं. राज्यात सर्वत्र अतिवृष्टीने थैमान घातलेलं असताना शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. “शेतकरी सणासुदीच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कडू होत असतांना मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ द्यायची नाही”, असा पवित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली दादा भुसेंच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आलं.

कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुसेंच्या एका शब्दावरून इथलं वातावरण आणखी पेटलं. “आंदोलनाची स्टंटबाजी करू नका. आपण चर्चा करून आपले प्रश्न मार्गी लावू”, अशी विनंती दादा भुसेंनी यावेळी हात जोडून केली. परंतु, ‘स्टंटबाजी’ या शब्दावर आक्षेप घेत आंदोलकांनी दादा भुसेंविरोधात आणखी जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यामुळे, काही वेळासाठी इथे तणाव निर्माण झाला होता. मात्र, पुढे चर्चेनंतर इथली परिस्थिती नियंत्रणात आली.

२ तासांच्या चर्चेनंतर आंदोलन मागे!

कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांसोबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. तब्बल २ तासांच्या चर्चेनंतर आंदोलकांना समर्पक अशी उत्तरं मिळाल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. सरकारने पीक विम्याचे पैसे दिले नाही, दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे पैसे जमा होईल असं सांगितलं मात्र ते झाले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चित्रपटगृहे, सांस्कृतिक केंद्रे पूर्ण क्षमेतेने सुरु करण्यास परवानगी”- अजित पवार

News Desk

#SushantSinghRajput : मुंबई पोलिसांचा तपास CBI कडे जाणार का, आज होणार सुनावणी

News Desk

“हे सगळं शरद पवारांचं नाटक”, किरिट सोमय्या संतापले

News Desk