HW News Marathi
महाराष्ट्र

आशिष शेलार आणि राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट, कारण…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची कृष्णकुंजवर भेट झाली. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

या पुस्तकावरच दोघांची चर्चा रंगली

सूत्रांच्या माहितीनुसार आशिष शेलार हे दर दिवाळीला राज ठाकरेंना भेटायला कृष्णकुंजवर येत असतात. आजही त्यांनी सकाळीच कृष्णकुंज गाठलं. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दिवाळी फराळ घेत घेत या दोघांनीही गप्पा मारल्या. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना यावेळी सिनेमावरील एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकावरच दोघांची चर्चा रंगली, असं सूत्रांनी सांगितलं. या भेटीनंतर आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधत भेटीचं कारणही सांगितलं.

राजकारणापेक्षाही दीपावलीमध्ये एकमेकांना भेटायचं असतं. दिवाळीनिमित्त आमची भेट ठरली होती. ‘द बूक ऑन मुव्ही’ हे जगभरातील 100 सर्वोत्कृष्ट सिनेमांवरील पुस्तक पेंग्विन पब्लिकेशनने प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक मी पाहिलं होतं. मला आवडलं. त्यामुळे राज यांना मी हे पुस्तक भेट म्हणून दिलं. शिवाय त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, असं शेलार यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार ‘एचएएल’च्या कर्मचाऱ्यांच्या भेटीला

News Desk

हवं तर आम्ही तुमच्यासोबत राज्यपालांकडे येतो, पण दिखावू आणि फसवणूक करणारा अध्यादेश काढू नका: फडणवीस

News Desk

देशमुख, परमबीरांचं कुठे हनीमून सुरू आहे ते शोधा! फडणवीसांचा हल्लाबोल

News Desk