HW News Marathi
देश / विदेश

माझा आतला आवाज सांगत होता की…! केदारनाथमध्ये मोदींचं विधान

नवी दिल्ली । पंतप्रधान मोदी हे सध्या केदारनाथ दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांचा आढावा घेण्यासह यावेळी मोदींनी शंकराचार्यांच्या १२ फूट उंच आणि ३५ टन वजनाच्या मूर्तीचं अनावरणही केलं. यावेळी मोदींनी ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पुनर्बांधणी प्रकल्पांचं उद्घाटन केलं. भाषणाला सुरुवात करताच मोदी म्हणाले, “केदारनाथमधील दुर्घटनेनंतर ते पुन्हा उभं राहू शकेल का? असा प्रश्न लोकांना पडला होता. पण माझा आतला आवाज सांगत होता की केदारनाथ पूर्वीपेक्षा जास्त अभिमानाने उभं राहील. माझा हा विश्वास पूर्ण झाला समाधान आहे.”

केदारनाथमध्ये भाषण करताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “गोवर्धन पूजेच्या दिवशी मला केदारनाथ धाम येथे दर्शन-पूजा करण्याचं भाग्य लाभलं आहे. मी केदारनाथला येतो, प्रत्येक कणात सामील होतो. केदारनाथच्या सेवेपेक्षा दुसरं मोठं पुण्य नाही. ही ईश्वरी कृपा आहे. आज केदारनाथमध्ये प्रवासी सेवा आणि सुविधांशी संबंधित अनेक योजनांची पायाभरणी करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकार, मुख्यमंत्री धामी आणि या कामांची जबाबदारी घेणाऱ्या अन्य सर्वांचे मी आभार मानतो”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या ‘फडणवीस’ असण्यामुळे शरद पवारांनीही भूमिका बदलल्या !

News Desk

‘येस बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांना ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी

swarit

भारतीय राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व हरपले | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk