HW News Marathi
महाराष्ट्र

‘अमित शाहांनी भेट नाकारली यात काही अर्थ नाही पण भेट झाली असती तर….’ – चंद्रकांत पाटील

नवी दिल्ली। अमित शाह यांनी भेट नाकारल्याची चर्चा असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की “काल रात्री रावसाहेब , दानवेंकडे जेवण झालं. अमितभाई आणि मोदीजी यांची भेट सोडली तर सगळ्यांच्या भेटी झाल्या. दिल्लीत अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आम्ही फॉलोअप घेतला नाही. अमित शाहांनी भेट नाकारली यात काही अर्थ नाही. हे खरं आहे की भेट झाली असती तर आनंद झाला असता” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील आज दिल्लीवरुन मुंबईला परतले. त्यावेळी पत्रकारांशी हा संवाद साधला आहे.

नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांना भेटलो

देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, मी आमचं वारंवार दिल्लीला जाणं होतं, आमचा सातत्याने प्रयत्न असतो, नेक्स्ट जनरेशन उभं केलं पाहिजे. त्यामुळे राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, बावनकुळे, श्रीकांत भारती असा ग्रुप घेऊन नवीन मंत्री झालेल्या भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील यांना भेटलो. त्यांचं अभिनंदन करणं त्यांची खाती समजून घेणं, असा हा कार्यक्रम होता. साधारण कोव्हिडच्या आधी दरवर्षी खासदारांना जेवण देणं आणि महाराष्ट्रातील मुद्दे सांगणे हे होत होतं. गेल्या दोन वर्षात ते झालं नव्हतं. असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे खरं आहे की भेट झाली असती तर आनंद झाला असता

केंद्रीय गृहमंत्री अमितभाई आणि मोदीजी यांची भेट सोडली तर सगळ्यांच्या भेटी झाल्या.. दिल्लीत अधिवेशन सुरु आहे. अमित शाहांनी भेट नाकारली यात काही अर्थ नाही.. हे खरं आहे की भेट झाली असती तर आनंद झाला असता.मनसेसोबत युतीसाठी भेट नव्हती. त्यावेळी परप्रांतियांच्या भूमिकेबद्दल चर्चा होती. आज युतीचा प्रस्ताव नाही, उद्या झाली तर माहित नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं.

ती भेट टाळता आली असती

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसे यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांनी जोर धरला. मात्र दिल्ली दौऱ्यावर असलेल्या भाजपच्या बड्या नेत्यांची याबाबत कुठेच वाच्यता झाली नसल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटील – राज ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय भाजप नेत्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं आहे. इतकंच नाही तर सध्या ही भेट टाळता आली असती अशी केंद्रीय भाजप नेत्यांची धारणा असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे केंद्रीय भाजपकडून मनसेसाठी रेड ॲलर्टच असल्याचं चित्र आहे. संबंधित भेट ही फक्त प्रदेश भाजपचीच होती, असं म्हणत केंद्रीय भाजपकडून राज ठाकरेंची मनसे वेटिंग लिस्टवरच असल्याचं दिसतंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायमराठीतील साहित्यकृतींना राष्ट्रीय सन्मान मिळणे अभिमानास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna

उरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध! – आदिती तटकरे

Aprna

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी होणार मोदींच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक..!

News Desk