HW News Marathi
महाराष्ट्र

“दोन डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार का?” केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ तारखेपासून सर्वसामान्यांसाठी लोकलने प्रवास सुरु करण्याची परवानगी दिली आहे. परवानगी तर दिली आहे मात्र अटी देखील लागू केली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईच्या लोकलमधून प्रवासाची परवानगी दिल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाब्दीक चिमटा काढला आहे.

मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नसल्याने त्यांच्यावर विरोधी पक्ष सतत टीका करत असतो. “दोन डोस घेतलेले सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करतील पण दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का? गर्दी टाळण्यासाठी तसही तुम्ही स्वत:च मर्सिडीझ चालवत असल्याने बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाही. दोन डोस झालेल्यांना जे नियम, ते स्वत:ही अमलात आणणार की अजूनही वर्क फ्रॉम होम करणार” असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

“सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर!”, असे ट्वीट भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर केले होते.

भाजपाच्या आंदोलनानंतर सरकारला जाग

मुंबई लोकलच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना लसीचे दोन घेणाऱ्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नागरिकांच्या रोषामुळे महाविकास आघाडी नमलं अशी, टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली होती. भाजपाच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली, असा निशाणा त्यांनी साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”

News Desk

‘दोन वर्षात म्हातारी मुलीला भेटली नाही’, मुलगी म्हातारीला भेटायला आली नाही – पाटलांचा सरकारला टोला!

News Desk

करुणा शर्मा कोल्हापूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात

Aprna