HW News Marathi
महाराष्ट्र

‘राम शिंदेंचा कट्टर समर्थक रोहित पवारांच्या गटात दाखल’

अहमदनगर | भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनी पदत्याग केला आहे. ढोकरीकर सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहताना दिसतात. राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पद सोडण्याचं कारण?

प्रसाद ढोकरीकर यांनी त्यांचं पद सोडण्याचं कारण सांगितलं आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे पद सोडत असल्याचे प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले आहे. आजारपणामुळे आपल्याला जिल्ह्यात फिरता येणार नाही, असाही उल्लेख त्यांनी राजीनाम्यात केला आहे. प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे आणि इतर लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य केल्याबद्दल ढोकरीकरांनी ऋण व्यक्त केले आहेत. पदाचा राजीनामा दिला असला, तरी भाजपचा सक्रिय सदस्य राहणार असल्याचंही ढोकरीकर यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांशी जवळीक

प्रसाद ढोकरीकर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना दिसत आहेत. ढोकरीकर यांच्या व्यामशाळेचे उद्घाटनही रोहित पवारांच्या हस्ते करण्यात आले होते. पक्षाच्या अंतर्गत वादामुळे ढोकरीकरांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे ढोकरीकर यांची संघाशी जवळीक असून भाजपच्या दिग्गज नेत्यांशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

रोहित पवारांकडून राम शिंदेंचा पराभव

कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती.

रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून १ लाख ३४ हजार ८४८ मतं मिळाली. तर राम शिंदे यांना ९१ हजार ८१५ मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना ४३ हजार ९४७ मताधिक्यांनी पराभूत केले.

रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं होतं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

News Desk

…म्हणून उध्दव ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांना नमस्कार!

News Desk

बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा! – रुपाली चाकणकर

News Desk