HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिक यांच्या विरोधी भाजप नेते मोहित कंबोज यांची पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई। कार्डीलिया क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मेहुण्याची सुटका करण्यात आल्याबद्दल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर या दोन नेत्यांमध्ये सुरू झालेला वाद आता सांताक्रूझ पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. नवाब मलिक यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

नबाव मलिक यांच्याकडून पदाचा गैरवापर

कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मलिक यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कंबोज यांनी केलाय. गेल्या महिन्याभरातील घटनांचा उल्लेख असलेले पत्र आणि या संदर्भातील सर्व पुरावे मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्याचे कंबोज यांनी सांगितले. नबाव मलिक यांच्याकडून पदाचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय. त्यामुळे मलिक यांना पदावरून हटवण्याची मागणी केलीय.

माझी भूमिका ही स्पष्ट आहे. जे पदाचा गैरवापर करून कमाई करतात त्यांच्याविरोधात मोहीम आहे. ही प्रवृत्ती आहे. हा लढा प्रवृत्तीविरोधी आहे. कुठल्याही संस्थेला मी दोष देत नाही. पण ती चालवणारे लुटमार आणि प्रशासनाची फसवणूक करत असतील, तर थांबवण्यासाठी माझी लढाई आहे. ज्यांचा असल्या लुटारूंना पाठिंबा आहे ते तक्रारी करणार याची मला जाणीव आहे. पण असल्या धमक्या आणि तक्रारींना मी घाबरणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रिया दत्त काँग्रेसच्या सचिव पदावरून पाय उतार

swarit

मराठा आंदोलनात पोलीस कॉन्स्टेबलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

News Desk

काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक!

News Desk