HW News Marathi
महाराष्ट्र

ओबीसी नेते छगन भुजबळ-पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येणार!

नाशिक। ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे ओबीसी नेते छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाशिकमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर येणार आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम येत्या १ नोव्हेंबरला होणार आहे. या निमित्ताने भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी हा योग जुळवून आणला आहे.राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षणामुळे वातावरण तापले आहे. असे असताना हे दोन्ही ओबीसी नेते एकत्र येत असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र व देशपातळीवर ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बऱ्याच चर्चा झाल्या. यासाठी राज्यव्यापी आंदोलनही करण्यात आले.

दोन्ही नेत्यांकडून काय वक्तव्य केलं जाते याकडे लक्ष

आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ओबीसीसाठी महत्त्वपूर्ण असलेले छगन भुजबळ तसेच ओबीसीसाठी नेहमीच झटणाऱ्या पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपाचे संपर्क नेते जयकुमार रावल तसेच अन्य काही मान्यवरदेखील आमंत्रित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नामको बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या नुतनीकरणाच्या कार्यक्रमालाही हे दोघे एकत्र येणार आहेत. अशात या दोन्ही नेत्यांकडून काय वक्तव्य केलं जाते याकडे लक्ष लागून आहे.नाशिकमध्ये सोमवारी संदर्भसेवा रुग्णालयातील विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यांनीच भुजबळ आणि पंकजा यांना जिल्ह्यात एकाच व्यासपीठावर आणले आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात आहे. त्यापूर्वी आमदार फरांदे यांनी महापालिकेतील स्वपक्षाच्या सत्ताधाऱ्यांना अनेकदा कोंडीत पकडले आहे. विशेषतः शहरातील रस्त्यावरी खड्डे बुजविण्याचे प्रकरण असो की, डेंग्यू प्रश्न. त्या नेहमीच भाजपला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करतात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही’, निलेश राणेंचा हल्लाबोल

News Desk

“दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करणं हे भाजपचे षडयंत्र!”

News Desk

‘ठरल्याप्रमाणे झालं असतं तर मी फोटोग्राफी करुन तुम्हाला प्रदर्शनाला बोलावलं असतं’ फडणवीसांना प्रतिउत्तर

News Desk