HW News Marathi
Uncategorized

कुठे अडचणी, कुठे दिलासा! Sameer Wankhede प्रकरण कुठपर्यंत आलंय?

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. कारण, या आर्यन खान प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाबाबत दक्षता पथकाकडून समीर वानखेडे यांची बुधवारी चार तास चौकशी करण्यात आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही या लाचखोरी प्रकरणात मोठं पाऊल उचललं आहे. समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चार अधिकाऱ्यांची नेमकणूक केली आहे. यासंदर्भातील आदेश मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी जारी केलेत. दुसरीकडे आज सकाळी पुणे पोलिसांकडून केपी गोसावी जो समीर वानखेडेंचा निकटवर्तीय मानला जातो, त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे या दोन गोष्टींमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढल्या आहेत तर दुसरीकडे मात्र मुंबई उच्च न्यायालयाकडून समीर वानखेडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकं काय घडलंय? पाहूया.

#SameerWankhede #NawabMalik #AryanKhan #NCB #KPGosavi #MaharashtraPolitics #Maharashtra #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी शाळेच्या विश्वस्ताला अटक

News Desk

२०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार येणार!

News Desk

इस्त्रोच्या ‘चांद्रयान – २’ने काढला चंद्रा पहिला फोटो

News Desk