HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांना पुन्हा झटका; मावस भावाच्या घरावर ED ची छापेमारी

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. याचं कारण असं की, आयकर विभागाने अजित पवारांच्या बहिणींच्या घरांवर छापेमारी केल्यानंतर आता ईडीने त्यांच्या मावस भावाला गाठलं आहे. ईडीने आज (२८ ऑक्टोबर) सकाळी अजित-पवारांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी धाड टाकली. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आल्याचं वृत्त असून निश्चितच हा कारवाईमुळे अजित पवारांना आणखी एक धक्का बसलाय.

अजित पवारांचे मावस भाऊ असलेले जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. या सहकार कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत. दरम्यान, कारखान्याकडून हे आरोप फेटाळण्यात आल्यानंतर आता ईडीने थेट छापमारी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे ईडीची धाड पडली तेव्हा जगदीश कदम हे मुंबईत होते. मात्र, याबाबतची माहिती कळताच ते आता मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

कारखान्यावर आयकर विभागाची धाड

किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दौंड साखर कारखान्यावर ७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती. या धाडीनंतरही आता थेट या कारखान्याचे संचालक कदम यांच्या घरी ईडीने छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मी…!

किरीट सोमय्यांनी पुढे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरलं आहे. “ठाकरे सरकारची बदमाशी सुरु आहे. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. ते सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. परंतु, तरीही सरकारने याबाबतची कारवाई थांबवली आहे. स्वतःचे घोटाळे दाबण्यासाठी इतरांना अडचणीत आणण्याचं आणि लक्ष विचलीत करण्याचं हे काम सुरु आहे”, असं सोमय्या म्हणाले. त्याचप्रमाणे, “येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मी अलीबाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे बाहेर काढणार”, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्र बदनाम करण्याचं कारस्थान रचलं!

News Desk

“उर्जामंत्र्यांचे निर्णयही प्रशासन मानत नाही”, भाई जगतापांची टीका

News Desk

शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीवरून बीडमध्ये राडा!

News Desk