HW News Marathi
महाराष्ट्र

तळीये दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात भर! १५ दिवसांनी एका महिलेचा मृत्यू

तळीये | कोकणात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे महाडच्या तळीये गावात दरड कोसळली होती. या अपघाताचा मृत्यूदार आता ८५ वर गेला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. संगीता कोंडाळकर असे मृत महिलेचे नाव आहे. जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या गावात दुर्घटना झाल्यानंतर जवळपास १५ तास कोणीही पोहोचू शकलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी दुपारी टीव्ही 9 मराठीने याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर, राज्याला या दुर्घटनेची माहिती मिळाली.

३१ नागरिक अजूनही बेपत्ता

महाडच्या तळीये गावातील दुर्घटना अत्यंत भयानक होती. मृत व्यक्तींचा अडका आधी ५३होतं पण आता तोच एकदा ८५ वर गेला आहे. तर अनेकजण बेपत्ता होते. २२ जुलैला घडलेली ही घटना २३ जुलैला समोर आली होती. घटनेच्या पाच दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं . बचाव पथकाला ५३ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर ३१ नागरिक अजूनही बेपत्ता होते. “आम्ही या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ८४ नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता फक्त सरकारने सर्वांना मृत घोषित करून मदत करावी आणि आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा”, असं आवाहन तळीयेचे सरपंच संपत तांदळेकर यांनी केलं आहे.

गावातील घरांचे पुनर्वसन

दरम्यान, महाड – तळीये या गावातील ग्रामस्थांचे सुरक्षित जागी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच ६० घरांचे पुनर्वसन नवीन जागी केलं जाईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाडमध्ये झालेल्या प्रलयंकारी पावसामुळे तळीये गावात दरड कोसळून त्यात ८४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता. पुण्यातील आंबेगाव येथील माळीण गावाप्रमाणेच तळीयेचे देखील लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी होत होती.

नेमकं काय घडलं?

२२ जुलैला गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली ३५ घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलत आहे! – वर्षा गायकवाड

Aprna

मनसेचे पक्ष बांधणी सुरू, या ‘३’ नेत्यांची कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती

News Desk

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत सांकेलीम मतदारसंघातून 300 मतांनी आघाडीवर

Aprna