HW News Marathi
महाराष्ट्र

गँगस्टार शरद मोहोळच्या पत्नीने केला चंद्रकांत पाटलांचा सत्कार, प्रवेश मात्र टाळला!

पुणे।कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे आयारामांनी एका पक्षातून उड्या टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पोहोचली पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सत्कारावरच हा कार्यक्रम आटोपता घेतला.

गुंडांच्या प्रवेशाची घटना

भाजपमध्ये गुंडांच्या प्रवेशाची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकच पुण्यात प्रकाशन झालं. यावेळी गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा विशेष सत्कार केला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणले होते.त्याचबरोबर शरद मोहोळ यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला संतोष लांडे यांची पत्नी गायत्री लांडे यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत चंद्रकांत पाटलांचा सत्कार केला.

निवडणुकीचे रणशिंग फुंकल्या सारख वाटतंय

शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी खून प्रकरणातील आरोपी होता. न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केलेली आहे. मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव या दोघांनी 2012 मध्ये कातील सिद्दीकीचा येरवडा जेलमध्ये खून केल्याचा आरोप आहे.एवढंच नाहीतर शरद मोहोळवर याशिवाय मोक्का अनव्यये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याप्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपच्या अनेक जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. तर भाजपने आयत्या वेळी हे प्रवेश टाळत केवळ सत्काराचा कार्यक्रम केला.दरम्यान, कार्यक्रम चांगला झाला निवडणुकीचे रणशिंग फुंकले सारख वाटतंय. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. आम्ही कुणालाही पास दिलेले नव्हते कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता, आता त्यांनी शक्तिप्रदर्शन का केलं हे त्यांना विचारा. सध्या पक्षात प्रवेश देण्यासाठी कोर कमिटी आहे, ती निर्णय घेईल आता त्यांना प्रवेश देण्याबाबत कुठलाही निर्णय नाही. केवळ कोथरूडच्या आमदारांच्या चांगल्या कामाच्या कौतुकासाठी ते आले होते, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुणे महापालिकेचा राजकीय आखाडा सज्ज

येत्या दोन ते महिन्यांत राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामध्ये पुणे महापालिकेची निवडणुकही होणार आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पुण्यात राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत. मग नेते-पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असोत, बैठक असोत वा सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी…! पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते झटकून कामाला लागलेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चंद्रकांत पाटील आधी झोपेतून जागे व्हा”, संजय राऊतांची विखारी टीका!

News Desk

उदयनराजे यांनी घेतली गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट 

News Desk

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस महाविकासआघाडीमध्ये सहभागी! नाना पटोले

Aprna