HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणाची अवस्था ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटासारखी होईल ! । फडणवीस

मुंबई । “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची अवस्था ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटासारखी होईल”, असे गंभीर विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असल्याने भाजपकडून महाविकासआघाडीला कोंडीत पकडले जात आहे. त्याचसोबत, या प्रकरणी राज्य सरकारच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “राज्य सरकार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चिघळण्याची मोठी शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, “पूजा चव्हाण प्रकरणी राज्य सरकारकडून फार काही कारवाई होईल असं वाटत नाही. ‘नो वन किल्ड जेसिका’ या सिनेमासारखी या प्रकरणाची अवस्था होईल. हा सर्व प्रकार ठाकरे सरकारच्या आशीर्वादानेच सुरु आहे. राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे.” तर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी राज्य सरकारला सुनावत गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, भाजप या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याने ठाकरे सरकारच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. संजय राठोड राजीनामा देणार का ? हा प्रश्न कायम आहे.

चंद्रशेखर बावनकुळे याविषयी बोलताना म्हणतात की, “संजय राठोड सध्या कुठे आहेत ते कोणालाही माहिती नाही. पोलीस महासंचालक प्रेस रिलीज काढत नाहीत. सरकार बाकीच्या वेळी सतत ट्वीट करतं मग आता का करत नाही? हा बेपत्ता झालेला मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही, सरकारी निवासस्थानामध्ये नाही, यवतमाळमध्येही नाही. याच माध्यमातून, राज्य सरकार जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे”, असा गंभीर आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

राज्यात ३ पथकांकडून तपास सुरू

पूजा चव्हाण प्रकरणी एकीकडे पोलीस निष्पक्षपणे, योग्यरीत्या तपास करत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी राज्यातील वेगवेगळ्या भागांत एकूण ३ पथकांकडून तपास सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत आणि शाहू महाराज यांची भेटी; मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून केली चर्चा

Aprna

माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करु नका; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर परखड टीका

News Desk

#Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी

News Desk