HW News Marathi
महाराष्ट्र

“….तर या विरोधात कोर्टात चॅलेंज करणार” – समीर वानखेडे

मुंबई। एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या रडारवर असल्याचंच चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करत आरोप करणाऱ्या नवाब मलिकांनी वानखेडेंबद्दल आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. मलिकांनी एक कागद ट्वीट केला आहे, जो जन्मदाखला असल्याचा दावा केला जात असून, तिथूनच फसवणुकीची सुरूवात असल्याचं मलिकांनी म्हटलं आहे.नवाब मलिक यांनी सोमवारी आणखी एक ट्वीट करत एक बृहन्मुंबई महापालिका असं नाव असलेला कागद शेअर केला आहे. हा कागद समीर वानखेडे यांचं जन्मप्रमाणपत्र असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यावरून आता मलिकांनी वानखेडेंना लक्ष्य केलं आहे. वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे, असा इशारा समीर वानखेडे यांनी दिला आहे.

नवाब मलिक याचं ट्विट

नवाब मलिक यांनी सोमवारी आणखी एक ट्वीट करत एक बृहन्मुंबई महापालिका असं नाव असलेला कागद शेअर केला आहे. हा कागद समीर वानखेडे यांचं जन्मप्रमाणपत्र असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यावरून आता मलिकांनी वानखेडेंना लक्ष्य केलं आहे.हा जन्मदाखला शेअर करताना मलिकांनी येथूनच फसवणुकीला सुरुवात होते असं म्हटलं आहे. या जन्मदाखल्यावर समीर दाऊद वानखेडे असं नाव लिहिलेलं आहे. त्याचबरोबर तारांकित चिन्ह असून, प्रमाणपत्राच्या उजव्या बाजूला ज्ञानदेव वानखेडे असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर या प्रमाणपत्रावर धर्म मुस्लिम असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

मलिकांना समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करायचा असेल. समीर वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार केलं, याकडेही त्यांना लक्ष्य वेधायचं असेल. मात्र यामागचं नेमकं कारण मलिकांनी भाष्य केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown : सोशल मीडियावर धार्मिक रंग देणाऱ्यांवर सायबर सेलची कारवाई

News Desk

लतादिदींच्या निधनानं संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगलं; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

तब्येत खराब असल्यानेच पंकजा मुंडे गैरहजर कोणीही वेगळा अर्थ काढू नये – प्रितम मुंडे

News Desk