HW News Marathi
महाराष्ट्र

“इंटर्व्हलनंतरची स्टोरी मी सांगतो”, NCB प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई। एनसीबीच्या छापेमारीचं प्रकरण उघड झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत चांगलेच भडकले आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा इशाराच संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलतांना दिला आहे. वसुली गँग कुणाच्या होत्या. मी सांगितलं ना. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे, असं देखिल संजय राऊत यांच्या कडून स्पष्ट करण्यात आलं.

पण तुमच्या काळजाला वार झाला

गोसावी, परमबीर सिंग कुठे हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली. तेच सांगू शकतील. किंवा त्यांचे समर्थक पार्टीच सांगेल, असं ते म्हणाले. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येते. बड्या लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो. माझी मागणी आहे या प्रकरणाची चौकशी करावी, असंही त्यांनी सांगितलं. तर भाजपने या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची देखील मागणी केली आहे. आणि त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सीबीआयची चौकशी व्हावी. जरुर व्हावी. सीबीआय तुमच्या खिशात आहे ना? तुम्हीही अनेक व्हिडीओ बाहेर आणले. पण तुमच्या काळजाला वार झाला. तुम्ही म्हणताय ना चौकशी करा… करा. अजून दहा व्हिडीओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी असं खुल आव्हानच संजय राऊत यांनी दिल आहे.

या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांशी बोललो आहे. राज्याला बदनाम करण्याचं षडयंत्रं रचलं गेलं. त्याला काही अधिकाऱ्याने हे बिंग फोडलं. पण या मुलाने बिंग फोडलं. त्याच्या साहसाला मी दाद देतो. त्याने देशावर उपकार केले, असंही राऊत म्हणाले. साक्षीदाराचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. या मुलाने मोठं धाडस केलं. त्याने देशावर उपकार केले. मी त्याच्या धाडसाचं कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. आता मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी बाहेर येईल, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा बांलणीवर

News Desk

हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!

News Desk

राज्यमंत्री बच्चू कडूंची कबड्डीच्या मैदानात एंट्री

News Desk