HW News Marathi
महाराष्ट्र

जरंडेश्वरचा मालक कोण?, सोमय्यांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं उत्तर!

पुणे। जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण? असा सवाल किरीट सोमय्यांनी अजित पवार यांना केला होता. या कारखान्याच्या मालकाचं नाव जाहीर करण्याचं आवाहन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं होतं. त्यावर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरंडेश्वर कारखान्याच सगळा कारभारच मांडला. त्यावर आता सोमय्या काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.जरंडेश्वर साखर कारखाना सातारा हा ६६ कोटी ७५ लाखला गुरु कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांनी तो विकत घेतला. हनुमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर मिल काढली. त्यांचं कुटुंब त्यात होतं. त्यांना त्या वर्षी तोटा आला. त्यामुळे त्यांनी तो कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवायला दिला. तो कारखाना दुसरी कंपनी चालवत आहेत. सुंदरबन कोऑपरेटीव्ह सोसायटी ही मुंबईतील सोसायटी आहे. त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने जरंडेश्वरच्या लिलावाबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

काही निष्पन्न झालं नाही

साखर कारखानदारी बद्दल खूप काही गेल्या काही दिवसांपासून बोललं गेलं. खूप बातम्या आल्या. या गोष्टीला 12 ते 15 वर्ष झाले या बातम्या येत असताना मी उत्तर देत नव्हतो. पण आता अतिरेक झाला आहे म्हणून उत्तर देत आहे. त्याकाळात 25 हजार कोटी, काहींनी 10 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नवीन सरकार आलं त्यांनी सीआयडीला चौकशी करायला लावली. त्यात काही निष्पन्न झालं नाही. एसीबीने चौकशी केली. त्यातही स्पष्ट झालं नाही. सहकार विभागानेही चौकशी केली. त्यातही काही निष्पन्न झालं नाही, असं पवार यांनी सांगितलं.

पण काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करता

राज्यातील किती साखर कारखाने विकले गेले आणि कुणी विकत घेतले याची यादीच पत्रकार परिषदेत जाहीर केली. 65 साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 64 सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपनीने विकत घेतले. काही लोकांनी चालवायला घेतले तर काहींनी इतरांना चालवायला दिले. पण काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींवर नाराजीचा प्रश्नच नाही, पण…, खासदार संभाजीराजे म्हणाले…

News Desk

कोश्यारीजी इतका अभ्यास बरा नाही; राऊतांचा टोला

Aprna

‘फक्त रक्ताचं नातं म्हणून माझ्या 3 बहिणींच्या घरी आयकराचे छापे’- अजित पवार

News Desk