HW News Marathi
महाराष्ट्र

“समीर वानखेडेला आव्हान देतो, वर्षभरात नोकरी जाईल”, नवाब मलिक यांचा दावा!

मुंबई। मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यावेळी बोलताना समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केलंय.समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल. तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असा घणाघात मलिक यांनी केलाय.

तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते

समीर वानखेडे प्रसिद्धसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी मीडिया घेऊन का गेले? चित्रपट सृष्टीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. यात वानखेडे भाजप वाल्यांचा म्होरक्या आहे. बोगसगिरी करतोय, त्यामुळेच या बोगस केसेस आहेत. हे कोर्टात टिकणार नाहीत. येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समजलंय. ही तोडपाणी थांबली पाहिजे, असेही नवाब मलिक म्हणाले.

केंद्र सरकारनं समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली केली

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर केंद्र सरकारनं समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली केली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. चार-चार हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉट्रसअॅप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभं करण्यात आलं व दहशत निर्माण करण्याचं काम केलं गेलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजेंविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का?

News Desk

बारामतीत सर्व ४९ जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश !

News Desk

सुप्रिया सुळेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट!

News Desk