HW News Marathi
महाराष्ट्र

NCB ची टीम शाहरूख खानच्या मन्नतवर दाखल!

मुंबई। क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर पोहचली. आज गुरूवारी सकाळीच शाहरूख खानने आर्यन खानची आर्थर रोड कारागृह येथे दहा मिनिटे भेट घेतली. त्या घटनेला काही तास उलटताच तोच शाहरूख खानच्या घरी एनसीबीचे पथक पोहचले. जवळपास तीन चे चार अधिकाऱ्यांचे पथक मन्नतवर दाखल झाले आहे. दुसरीकडे बॉलिवुडच्या अभिनेत्रीच्या वांद्रे घरीही एनसीबीची टीम दाखल झाली आहे. अनन्या पांडेला एनसीबीने समन्स बजावला आहे. अनन्या पांडेची दुपारी २ वाजता या ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार असल्याचे कळते. आज सकाळपासूनच एनसीबीने मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामध्ये अनन्या पांडेच्या अंधेरी येथील निवासस्थानी एनसीबीच्या टीमने छापा टाकला. आर्यन खान प्रकरणातच या दोन्ही छापेमारीचा संबंध असल्याचे कळते.

एनसीबीची एक टीम पोहचली

बॉलिवुड अभिनेत्री अनन्या पांडे ही आर्यन खानच्या संपर्कात असल्याचे एनसीबीच्या तपासात आढळल्याचे कळते. त्यामुळेच अनन्या पांडेच्या अंधेरीतील निवासस्थानी आज एनसीबीची एक टीम पोहचली. या टीमने अनन्याच्या घरी छापा टाकल्याचे वृत्त टी व्ही ९ या वृत्तवाहिनीने दिले आहे. तसेच अनन्याला या प्रकरणात समन्स बजावतानाच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. एनसीबीच्या पथकातील तीन ते चार अधिकारी हे अनन्या पांडेच्या घरी छापा टाकायला आज सकाळीच पोहचले. त्यानंतर अनन्या पांडेला समन्स बजावला असल्याचे कळते.

एनसीबीची टीम मन्नतवर

शाहरूख खानचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मन्नत याठिकाणी एनसीबीकडून तपास होऊ शकतो असा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला होता. आर्यन खान प्रकरणातच ही छापेमारी झाल्याचे कळते. एनसीबीचे पथक दुपारी १२.३० च्या सुमारास मन्नत निवासस्थानी पोहचले. आर्यन खान प्रकरणातील तपासातच ही छापेमारी असल्याचे कळते. कागद पत्रांच्या पुर्ततेसाठी एनसीबीची टीम मन्नतवर दाखल झाल्याचे कळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५० टक्क्याची आरक्षणाची मर्यादाही काढावी लागेल, संभाजीराजेंचा केंद्र सरकारला सल्ला!

News Desk

“जगासमोर आणखी एक संकट” तर WHO ने दिला ईशारा!

News Desk

चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये !

News Desk