जम्मू -काश्मीर | जम्मू – काश्मीर मध्ये एक दुःखद घटना घडली आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआ जवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. कठुआतील रणजीत सागर धरणात हेलिकॉप्टर कोसळलं. सध्या मदतकार्य सुरू असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळलं आहे.
नेमकं काय घडलं?
सकाळी १० वाजून २० मिनिटांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं. हेलिकॉप्टर धरण परिसरात कमी उंचीवर घिरट्या घालत होतं. त्याचवेळी ते धरणात कोसळलं. धरणात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
Kathua, J&K: An Indian Army helicopter crashes near Ranjit Sagar Dam. Details awaited. pic.twitter.com/ULx3NTeIhD
— ANI (@ANI) August 3, 2021
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम धरण परिसरात पोहोचली. सध्या पाणबुड्यांच्या मदतीनं धरणात बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरमध्ये किती जण होते, हा अपघात नेमका कसा झाला याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीलादेखील लष्कराचं एक हेलिकॉप्टरमध्ये जम्मूमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं. त्यात दोन पायलट होते. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.