HW News Marathi
महाराष्ट्र

टोपे साहेब, परीक्षार्थींसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच! भाजपचा संताप 

मुंबई । राज्यात आरोग्य विभागाच्या परिक्षेवरून मोठा संभ्रम निर्माण झाल्याने ठाकरे सरकारला टीकेचं धनी व्हावं लागत आहे. भाजपने महाविकासआघाडीवर या मुद्द्यावरून चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. “टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आता हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच”, असा टोला यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लगावला आहे.

परीक्षांसंदर्भातील ठाकरे सरकारच्या या निर्णयावर अतुल भातखळकर यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. “२४ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी परीक्षार्थींना सकाळी एका जिल्ह्यात आणि दुपारी वेगळ्याच जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ करण्यात आला आहे. मग परीक्षार्थींनी ही परीक्षा द्यायची कशी? त्यामुळे टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पोहोचण्यासाठी आता तुम्ही हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच”, असा संतप्त टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

राजेश टोपेंचा राजीनामा घ्या!

“एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर. टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच.आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेत दुसऱ्यांदा गोंधळ झालाय. थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा. नसेल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा”, असा इशारा सुद्धा यावेळी अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

महापापाची पुनरावृत्ती!

अतुल भातखळकर यांनी यावरून ठाकरे सरकारला चांगलंच सुनावलं आहे. “आरोग्य विभागाच्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त परिक्षार्थ्यांना वेठीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती करण्याचं काम महाभकास आघाडी सरकारने केलं आहे”, अशी देखील टीका यावेळी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही | मुख्यमंत्री

News Desk

एसटी परीक्षेचा निकाल जाहीर, ७४२ महिला उत्तीर्ण

News Desk

पवारांचा महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनही राष्ट्रवादी पंढरपूर जिंकू शकली नाही !

News Desk