HW News Marathi
देश / विदेश

बारावीच्या विद्यार्थ्यांचा दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार!

मुंबई। बारावीच्या विद्यार्थ्यंसाठी महत्वाची बातमी. दुपारी ४ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल मंगळवारी ३ ऑगस्टला दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

निकाल कुठे पाहायला मिळणार?

बोर्डाचा निकाल दिलेल्या विविध वेबसाईटवर पाहता येणार आहे.

१. https://hscresult.11 thadmission.org.in

२. https://msbshse.co.in

३. hscresult.mkcl.org

४. mahresult.nic.in.

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जपानचे शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

News Desk

छेडछाडप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या मुलावर कठोर कारवाईची मागणी

News Desk

CDS बिपीन रावत यांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk