HW News Marathi
Covid-19

आता लोकल प्रवास आणखी सोपा…

 

मुंबई | कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासासाठी आता मासिक पास बरोबरच तिकीटही मिळणार आहेत. तसंच, १८ वर्षांखालील सर्वांना कोणत्याही अटीविना प्रवास करता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळं लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर रेल्वे प्रशासनानं मुंबईकरांना सोनेरी बातमी दिली आहे.

दुसरी लाट ओसरल्यानंतर १५ ऑगस्टपासून कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, अशा प्रवाशांना केवळ मासिक पास दिला जात होता. नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा झाला. मात्र, दोन डोसची अट पूर्ण करणाऱ्या व क्वचित प्रवास कराव्या लागणाऱ्या नागरिकांची यामुळं कोंडी झाली होती. एखाद्या वेळच्या प्रवासासाठी पूर्ण मासिक पास काढणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांची ही कोंडी आता दूर झाली आहे. कोविडचे दोन डोस पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता तिकीट मिळणार आहे. मात्र, तिकीट खिडकीवर ही सुविधा उपलब्ध असेल. अन्य कुठल्याही प्रकारे तिकीट मिळणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमध्ये राज्यात पोलिसांवर हल्ल्यांच्या तब्बल १५९ घटना

News Desk

राहुल गांधींचे विधान जबाबदारीपासून पळणारे | देवेंद्र फडणवीस

News Desk

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार !

News Desk