HW News Marathi
महाराष्ट्र

‘काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय झाली’, नितेश राणेंवर राऊतांची टीका!

‘शिवसेना भवन आता वसुलीभवन झालंय’, अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी माहिम विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमात केली.यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘काही ठिकाणी काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय झाली असेल, असं मी कुठे तरी वाचलं होत. या सगळ्याविषयी आम्ही बोलण्यापेक्षा आमचे जे स्थानिक शाखाप्रमुख आहेत, ते बोलतील. हा शाखाप्रमुख स्तरावरील विषय आहे.’ तसेच राऊत पुढे म्हणाले की, प्रसाद लाड यांना देखील उत्तर शाखाप्रमुख देतील.

सीबीआय यामुळे सरकार पडणार असेल तर केव्हाच पडले असते

संजय राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे झारखंड आणि छत्तीसगडमध्ये सरकार पडणार नाही. पेगॅसस, पैशाची लालच किंवा ईडी, सीबीआय यामुळे सरकार पडणार असेल तर केव्हाच पडले असते.’

संजय राऊत यांचे ट्विट

गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असं ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी बोचरी टीका केली.

शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर, नितेश राणेंची टीका

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीला १०० दिवस पूर्ण, ठाकरे सरकारने घेतलेले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

swarit

राष्ट्रवादीचा पुरोगामीपणाचा बुरखा फाडला गेला, पडळकरांची जहरी टीका

News Desk

सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवारांचा नारायण राणेंना टोला!

News Desk