HW News Marathi
महाराष्ट्र

देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 41 हजारांवर, कोरोना रुग्णसंख्या वाढतीच!

Tuनवी दिल्ली। देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली. कालच्या दिवसात 41 हजार 831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर अ‍ॅक्टिव्ह केसेसही पुन्हा चार लाखांच्या वर गेल्या आहेत. कालच्या दिवसात 541 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

नवे कोरोना बाधित रुग्ण

गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 831 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 541 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 258 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

एकूण आकडा

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 16 लाख 55 हजार 824 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 8 लाख 20 हजार 521 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 24 हजार 351 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 10 हजार 952 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

लसीकरण झालेला आकडा

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 47 कोटी 2 लाख 98 हजार 596 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा

Aprna

भाजपने किरीट सोमय्या आणि राणांना रोजगार मिळवून दिलाय; नीलम गोरेंचं टीकास्त्र

Manasi Devkar

डॉ.हंसराज वैद्य यांना फेस्कॉमचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान 

News Desk