HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आणि केंदीय यंत्रणांविरोधात आता राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढणार! – नवाब मलिक

मुंबई | राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरु असून याविरोधात पूर्ण ताकदीने लढण्याची भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज (१२ ऑक्टोबर) माध्यमांना दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी, रणनीती ठरल्यानंतर नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आयकर विभाग, ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजप महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक नेत्यांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्याचं काम करत आहे. त्यामुळे, या सर्व गोष्टींना खंबीरपणे सामोरं जाण्याचा निर्णय घेतल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारने किंवा भाजपने राष्ट्रवादीवर कितीही हल्ले केले किंवा केंद्रीय यंत्रणांचा वापर केला तरी आमचे नेते किंवा कार्यकर्ते डगमगणार नाहीत, असंही नवाब मलिक यावेळी म्हणाले आहेत.

नवाब मलिक आक्रमक

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानकडे कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही. बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी भाजप हा प्रयत्न करत असल्याचा आरोप यापूर्वी नवाब मलिक यांनी केला असून ते सातत्याने याबाबत आणखी माहिती देऊन काही दावे करत आहेत. त्याचप्रमाणे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय? असा मोठा सवालही मलिक यांनी यापूर्वी उपस्थित केला आहे.

जावयावरील कारवाईमुळे नवाब मलिकांना NCB चा राग – दरेकर

“मलिक यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. प्रत्येक गोष्टी राजकीय दृष्टीकोनातून बोलण्याचं त्यांचं काम असतं. ते भारतीय जनता पक्षासाठी द्वेषाने पछाडलेले आहेत. एनसीबीच्या बाबतीत त्यांचा पोटशूळ आणि राग आम्ही समजू शकतो. कारण त्यांच्या जावयावर एनसीबीने कारवाई केली आहे. यानिमित्ताने एनसीबीला दोष देता येतो का? त्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येतो का? असा सगळा केवीलवाणा प्रयत्न नवाब मलिक करत आहेत”, अशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

News Desk

देशाचे चौदावे राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान सुरू छगन भुजबळ जेलबाहेर

News Desk

“काय रे, अलिबागवरून आलायस का?”, असे कोणालाही विचारू नका

News Desk