HW News Marathi
महाराष्ट्र

डी.एस.कुलकर्णींच्या सील बंगल्यात चोरी; सहा लाखांच्या वस्तूंसह चोरटा फरार

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या ४ वर्षांपासून तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, चतुःश्रुंगी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाग्यश्री कुलकर्णी यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. खरंतर, डी.एस. कुलकर्णी यांच्यावरील कारवाईदरम्यान ईडीकडून त्यांचा बंगला जप्त करण्यात आला होता. त्यामुळे हा बंगला सील होता. मात्र, आता चोरट्यांनी हे सील तोडून बंगल्यात चोरी केल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील चतुःश्रुंगी मंदिराजवळील ४० हजार चौरस फुट जागेत डी.एस. कुलकर्णी यांचा हा बंगला आहे. कारवाईदरम्यान, ईडीकडून हा बंगला सील करण्यात आला होता. मात्र, चोरट्यांनी या बंगल्याचं सील तोडून देवघरातल्या चांदीच्या वस्तू, तब्बल ८ एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर्स, सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॅमेरा, गिझर अशा एकूण ६ लाखांच्या वस्तू चोरी केल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, भाग्यश्री कुलकर्णी यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आता या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वत: मुख्यमंत्री विरोधी पक्षातील आमदारांना फोन करतात !

News Desk

राज्य लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप केल्याने मुख्यमंत्री भडकले

News Desk

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Aprna