HW News Marathi
महाराष्ट्र

“पंकजा मुंडेसोबतचं नातं राजकारणापलिकडे”, ‘त्या’ चर्चांना फडणवीसांनी लावला पुर्णविराम

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंडे भगिणी नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. इतकंच नाही तर भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा अशाही मागण्या केल्या जात होत्या. दरम्यान, मोदी सरकारच्या केंद्रिय मंत्रीमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली होती. या नाराजीचे रुपांतर पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यात बदलले होते. यानंतर पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी समर्थक मुंबईला आले होते. यावेळी समर्थकांशी बोलताना पंकजा मुंडे असं म्हणाल्या होत्या की माझा नेता मोदी आणि शहा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेतल्याने त्या त्यांच्यावर नाराज आहेत अशाही चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाशी बोलताना भाष्य केले आहे.

पंकजा मुंडेंशी माझं नातं बहिणीप्रमाणे

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडेंशी माझं नातं बहिणीप्रमाणे आहे आणि आजही ते कायम आहे. राजकारण करताना जे काही शिकायला मिळालं त्यात गोपीनाथ मुंडे साहेबांकडून खुप काही शिकायला मिळालं. त्यांच्यासोबत जवळून काम करता आलं. त्यामुळे निश्चितच मुंडे परिवाराशी माझं भावनिक नातं आहे, आणि ते नातं राजकारणापलीकडे आहे. त्यामुळे त्या नात्यामध्ये काही कमी अधिक होईल असं मला वाटत नाही, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता अशा चर्चांना किमान फडणवीसांच्या बाजूने पुर्णविराम लागलेला दिसत आहे.

‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’,फडणवीसांचं पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ भाषणावर उत्तर

केंद्रिय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना जागा न मिळाल्याने मुंडे समर्थकांत कमालीची नाराजी होती. या नाराजीनंतर कार्यकर्ते पंकजा मुंडेंच्या भेटीला मुंबईत आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. यावेळी मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा होती. आता पंकजा मुंडे यांच्या याच भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती.

पंकजांच्या भाषणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’, असं म्हणत फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. “पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असं म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं होतं.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु अखेरीस त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यात भरीस भर म्हणजे पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं सत्र सुरु केलं. यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्ली वारी देखील केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची पंकजांनी भेट घेतली. त्यानंतर वरळीत पत्रकार परिषद घेत “माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. आम्ही कुणाला घाबरत नाही. मी कुणाचा निराधार करत नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याची चर्चा होती.

“आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू” माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले आहे. पंतप्रधानांनी मला झापल्याचं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसं काही दिसतं का? मला पंतप्रधानांनी कधी अपमानित केले नाही. नाही राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांनी फोन करून भेटायला बोलावले, कशासाठी ते अद्याप माहिती नाही !

News Desk

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर

News Desk

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्ताने पंकजा मुंडेंचा ‘सेवा संदेश’; व्हिडिओ प्रचंड व्हायरल

News Desk