HW News Marathi
महाराष्ट्र

मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं – शरद पवार

सोलापूर। गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात चांगलीच टोलेबाजी केली. “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल”, असं शरद पवार म्हणाले.पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयकर खात्याच्या धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर शरद पवारांनीही भाष्य केलं.

मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं

शरद पवार म्हणाले, “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.महागाईमुळे जनता जेरीस आली आहे. नेहरुंनी विकासाचा पाया रचला मात्र आताचं सरकार काय करतंय? दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता. नेहरुंनी पाया रचला. आज केंद्र सरकार काय करतंय? या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे. या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते

शरद पवार म्हणाले, “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पुन्हा आमचेच सरकार!”, किंकाळ्या मारणाऱ्याचे मानसिक संतुलन बिघडेल!

News Desk

१५ हजार लाच घेताना रंगे हात अटक

News Desk

सचिन वाझेंची क्राईम ब्राँचमधून बदली, गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

News Desk