HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर” राऊत म्हणतात अपना भी टाईम आयेगा !

नवी दिल्ली। ही राजकीय छापेमारी असेल किंवा आयकर असेल, सीबीआय असेल, ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

ही राजकीय छापेमारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे धाड सुरु आहे या विषयावर खासदार राऊत म्हणाले ही राजकीय छापेमारी आहे. ईडी, आयकर, सीबीआय यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात छापेमारी सुरु आहे. हे सुडाचे राजकारण आहे. यातून आम्ही देखील भरडले गेलाे आहाेत. उद्या काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. काही कारणांनी केंद्राचा अथवा भाजपचा. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्या निकटवर्तीयांना टार्गेट केले जात आहे. एखाद्या कुटुंबावर ते देखील राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरू. महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर अशा पद्धतीने टार्गेट केले जात आहे.

दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने होईल

दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने होईल, दसरा मेळावा हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलेला आहे. आम्ही देखील तशी तयारी करत आहोत. दसरा मेळावा होणार, आता हळूहळू कालपासून मंदिरे उघडली आहे. नियम पाळून सण साजरे होत आहे. दसरा मेळावा होईल पण कुठे होणार हे आता सांगू शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.शिवसेनेची कायम भूमिका आहे की मुंबईत पक्षाचा विस्तार व्हावा. मुंबईत शिवसेना स्वबळावरच लढत आहे. आम्ही स्वबळावर लढलो, शिवसेना मोठा पक्ष आहे, शंभरीच्या वर जागा, त्याच्या इतक्या जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय. पाच वर्षांपूर्वी निवडणूक ही आमच्या ताकदीवर आम्ही जिंकलो, असंही राऊत म्हणाले.

पार्थ पवार यांचे निकटवर्तीय सचिन शृंगारे यांचा नंदूरबारच्या समशेरपूर येथे आयान मल्टिट्रेट प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या कारखान्यावर काल आयकर विभागाने छापा मारला होता. आयकर विभागाचे पाच ते सहा अधिकारी ही तपासणी करत होते. मात्र आयकर विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. काल 12 तासाच्या तपासणीनंतर आज सकाळी पुन्हा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली आहे. आयकर विभागाच्या वतीने या प्रकरणात अजून कुठलीही प्रतिक्रिया आली नाहीये. आयकर विभागाच्या हाती काय लागते तपासणी संपल्यावर समोर येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

Aprna

महाराष्ट्रात उर्दू माध्यमांच्या शाळा १८ जूनला सुरू होणार

News Desk

पवार कुटुंबाची उद्या महत्त्वाची बैठक, अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार

News Desk