HW News Marathi
महाराष्ट्र

“आजोबा म्हणाले, दौरे टाळा, तरीही नातू दौऱ्यावर, आजोबांचा सल्ला फडणवीस आणि राज्यपालांसाठी?”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनाकारण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळण्याचं आवाहन केलं होतं. आजोबांच्या आवाहनानंतरी त्यांचे नातू आमदार रोहित पवार चिपळूणच्या दौऱ्यावर गेले होते. यावरुन विरोधकांनी शरद पवारांना कोंडीत पकडलं आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना एक सवाल केल आहे. आजोबा म्हणाले दौरा टाळा, मग आजोबांचा सल्ला नातवाला मान्य नाही का? की हे सल्ले फक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच होते, असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं खरं पण त्यानंतरही त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. नेमका हाच धागा पकडत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बोचरा सवाल उपस्थित केला. राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं….. आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही… कर्जत-जामखेडचे आमदार चीपळूणच्या दौऱ्यावर…. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?, असा बोचरा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.

शरद पवार यांचं आवाहन काय होतं?

राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. पवारांच्या आवाहनानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

रोहित पवारांचा कोकण दौरा

कोकणात अतिवृष्टीमुळं आणि दरडी कोसळून झालेलं नुकसान प्रचंड मोठं आहे… या संकटात उध्वस्त झालेले संसार नव्याने उभे करावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना १५ दिवसात लोकसभा, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार जाहीर करणार

News Desk

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ED कोठडी

Aprna

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला, शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk